बीड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड नगर परिषदेच्या प्रभागातील आरक्षणा नुसार आता महिलाराज बीडमध्ये पाहायला मिळणार आहे. बीड नगर परिषदेच्या 26 प्रभागातील 52 सदस्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे
बीड येथील नगरपरिषदेच्या २६ प्रभागांतील ५२ सदस्यांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. यावेळी उपमुख्याधिकारी सम्राट कदम यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही प्रक्रिया नगर परिषदेच्या हॉलमध्ये पूर्ण झाली.
यावेळी काही जणांनी आरक्षणावर आक्षेप घेतले, त्यावर अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तसेच काही आक्षेप असतील तर त्यासाठी वेळ दिला आहे. आपले आक्षेप सादर करावेत, त्यावर निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
...असे आहे वीड न.प.चे आरक्षण
प्रभाग १ ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग २-ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग ३- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग ४० अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग ६- ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग ७ सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण, प्रभाग ८ ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग ९-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १०- ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग ११-ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग १२- अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग १४-अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग १५- सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १६-ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग १७ ओबीसी,
सर्वसाधारण महिला, प्रभाग १८ ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग १९-ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग २०-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग २१-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग २२-ओबीसी महिला, सर्वसाधारण, प्रभाग २३ ओबीसी, सर्वसाधारण महिला, प्रभाग २४- ओबीसी महिला, सर्वसाधारण प्रभाग २५-सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग २६ अनुसूचित जाती महिला,
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis