सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। पूर, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 82 पेक्षा जास्त गावे बाधित झाली आहेत. त्यातील 12 ते 13 हजार कुटुंबांना बाराशे रुपयांचे आवश्यक रेशन किटचे पुढील चार ते पाच दिवस वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षक, कर्मचार्यांनी एक कोटी 20 लाख रुपयांची मदत केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. सीईओ जंगम यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सीईओ जंगम म्हणाले, पूरग्रस्तांना अनेक सेवाभावी संस्था, संघटना, उद्योजकांकडून अन्नधान्य किटचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, ते कीट सर्वांपर्यंत पोहच होत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक आणि अधिकारी एकत्रित येऊन एक कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. ती रक्कम अक्षय पात्र एनजीओकडे सुर्पूद करण्यात येणार आहे. त्या एनजीओकडून पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबांना बाराशे रुपयांचे कीट वाटप केले जाणार आहे. तसेच अक्षय पात्र एनजीओला दिलेली रक्कम आणि वाटप केलेल्या मालांचे ऑडिट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड