क्लस्टर पद्धतीने लागवड करावयांच्या पिकांच्या लागवडीला गती द्यावी - जिल्हाधिकारी डूडी
पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यात समूह पद्धतीने (क्लस्टर) लागवड करावयाचे निश्चित केलेल्या 10 पिकांच्या लागवडीस अधिक गती देण्यात यावी. या पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईला का याविषयी तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिका
क्लस्टर पद्धतीने लागवड करावयांच्या पिकांच्या लागवडीला गती द्यावी - जिल्हाधिकारी डूडी


पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्ह्यात समूह पद्धतीने (क्लस्टर) लागवड करावयाचे निश्चित केलेल्या 10 पिकांच्या लागवडीस अधिक गती देण्यात यावी. या पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईला का याविषयी तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समृद्धी योजनेंतर्गत दिशा कृषी उन्नतीची अनुषंगाने मुख्य उद्दीष्टे, प्रमुख दहा पिकांवर भर, 10 टक्के जिल्हास्तर निधीमधून प्रस्तावित बाबी, योजना संपृक्तता 80 टक्के निधीचे नियोजन आदी बाबींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी समृद्धी योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, कृषी महाविद्यालयाचे सहायक अधीष्ठाता डॉ. महानंद माने, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा कृषी अधिकारी एस.जे. पवार, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी, कृषी विभाग शास्त्रज्ञ तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

बैठकीत श्री. काचोळे यांनी सादरीकरणाद्वारे प्रमुख दहा पिकासाठी प्रस्तावित उपाययोजना, निर्यातक्षम केळी उत्पादन व प्रक्रीया, अंजीर प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीवर भर, निर्यातक्षत आंबा उत्पादन, निर्यातक्षम स्ट्रॉबेरी उत्पादन, करडई व सुर्यफूल तेलबिया प्रक्रिया, ऊस उत्पादकतेत स्थिरता राखणे, ज्वारी उत्पादन स्थिरता व प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती, शहरी भागात भाजीपाला पुरवठ्यास चालना देणे, भात उत्पादकता वाढ व प्रक्रियेस चालना देणे, सोयाबिन उत्पादकता वाढ व प्रक्रियेस चालना देणे आदी बाबत माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेंतर्गत लागवड करण्यात आलेल्या आंबा, केळी, अंजीर, स्ट्रॉबेरी फळपिके व इतर समाविष्ट पिके लागवडी बाबतचे प्राप्त उद्दीष्ट व सध्या लागवड केलेले क्षेत्र याबद्दल सविस्तर माहिती घेवून ते म्हणाले की, आंबा व केळी या फळपिकाच्या लागवडी करीता शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसत असून कृषी विभागाने मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य पुरवत शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांना फळपिकांच्या निर्यातीबाबत मार्गदर्शन करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande