लातूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रिमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरणेसाठी महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. सरल पोर्टलद्वारे महाडीबीटी पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध करुन दिलेला आहे.
तरी पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अर्ज मुख्याध्यापक यांनी तात्काळ महाडीबीटी पोर्टलवर भरून ऑनलाईन भरलेले अर्ज महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कार्यालय, लातूर यांचेकडे मंजुरीसाठी पाठवावेत, असे आवाहन लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक अभय अटकळ इतर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis