परभणी : आर.पी. हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाच्या वर्षभरात एक हजार यशस्वी एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी
परभणी, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने ग्रामीण आणि मागास भागात वैद्यकीय सुविधांचा नवा पायंडा पाडला आहे. गेल्या एका वर्षात हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाने
आर.पी. हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाने वर्षभरात केल्या 1000 यशस्वी एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी


परभणी, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

परभणी शहरातील डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटने ग्रामीण आणि मागास भागात वैद्यकीय सुविधांचा नवा पायंडा पाडला आहे. गेल्या एका वर्षात हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाने 1000 जटिल एन्जोप्लास्टी,एन्जोग्राफी यशस्वीरीत्या पूर्ण करून आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, ही बाब परभणीच्या वैद्यकीय इतिहासातील सुवर्णपान ठरली आहे. यात प्रामुख्याने लहान बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत.

या यशस्वी प्रवासात कार्डिओलॉजिस्ट डॉ.दिपक कुबडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाची भूमिका बजावली. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमर तडवी, तसेच मेडिसिन विभागातील तज्ञ डॉ. दैठणकर, डॉ. संतोष हारकळ, डॉ.शहाजी बोडखे, आणि डॉ.सलाम तांबोळी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. याशिवाय, राहुल कांबळे,शिवाजी जाधव, स्वप्नील बोर्डे, नर्सिंग इन्चार्ज अतुल लोंढे कॅथ लॅब टेक्निशियन फरीद पठाण, हर्ष कुढलकर यांनीही या यशात मोलाचा वाटा उचलला. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत या यशाला दिशा दिली.

गेल्या वर्षभरात हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाने अँजिओग्राफी, एन्जोप्लास्टी, परमनंट पेसमेकर, CRT, ASD, VSD, PDA (छातीतील छिद्र),Rota Aviation प्रक्रिया, CTO प्रक्रिया, प्रायमरी एन्जोप्लास्टी, लहान बालकांच्या हृदयाला असलेले छिद्र ,तसेच हृदयाभोवती जमा झालेले पाणी काढण्याच्या प्रक्रिया यशस्वीपणे केल्या. विशेष म्हणजे, अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल झाले होते. हृदयाचे ठोके कमी असणाऱ्या रुग्णांवर टेम्पररी पेसमेकरचा वापर करून, तर काही रुग्णांवर कमी रक्तदाब आणि किडनीवर सूज असतानाही यशस्वी एन्जोप्लास्टी करण्यात आली.

आर.पी. हॉस्पिटल मराठवाड्यातील एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून उदयास येत आहे. अत्याधुनिक कॅथलॅब, प्रशिक्षित सहाय्यक कर्मचारी आणि सुसज्ज आय.सी.यू. व्यवस्थापनामुळे हे हॉस्पिटल मुंबई व पुण्यातील मेट्रो कॅथलॅबच्या तोडीसतोड ठरत आहे.असे सांगत महाविद्यालयाचे प्रमुख डॉ.राहुल पाटील यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande