छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.14 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभाग व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे.
या निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप यादी हिंगोली जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय व गटविकास अधिकारी , पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध करुन देऊन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
या प्रारुप मतदार यादीवर कोणाचाही काही आक्षेप असल्यास याबाबत हरकती व सूचना संबंधित तहसीलदार यांच्याकडे दि. 14 ऑक्टोबर, 2025 पर्यंत सादर करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis