कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढी
कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी


पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी करण्यात असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

या आदेशात पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४८ व महामार्ग क्र.४ कडे जाणाऱ्या मार्गिकेवर (जुना पुणे- मुंबई महामार्गावर) किवळेकडून कात्रजकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

या वेळेत सातारा-सांगली-कोल्हापूर बाजूने बेंगलुरू महामार्गावरुन येणारी वाहने शिंदेवाडी टोलनाक्याच्या पुढे येणार नाहीत. तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड बाजुने बेंगलोर महामार्गावरुन जाणारी वाहने उर्से टोल नाक्याच्यापुढे व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने वडगाव फाट्याच्या पुढे प्रवेश करणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील वाहने व पुणे शहरात अंतर्गत भागात जाणारी-येणारी वाहतूकीस हा बंदी आदेश लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande