केदारनाथने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला; भाविकांची संख्या १६.५६ लाखांवर
देहरादून, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तराखंडमधील चारधाम यात्रा पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी असूनही यात्रेकरूंमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक ठरलेली केदारनाथ यात्रा यंदा गेल्या वर्षाचा विक्रम म
केदारनाथ


देहरादून, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।उत्तराखंडमधील चारधाम यात्रा पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचत आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी असूनही यात्रेकरूंमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक ठरलेली केदारनाथ यात्रा यंदा गेल्या वर्षाचा विक्रम मोडीत काढत बुधवारी (दि.८) १६,५६,००० यात्रेकरूंचा टप्पा पार केला आहे. सध्या केदारनाथधामाचे कपाट बंद होण्यास अजून १५ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे यात्रेकरूंची संख्या अजून वाढणार हे निश्चित आहे.

गेल्या वर्षी संपूर्ण यात्रा कालावधीत १६,५२,०७६ भक्तांनी बाबा केदारनाथाचे दर्शन घेतले होते. केवळ बुधवारीच केदारनाथ धामात ५६१४ यात्रेकरूंनी दर्शन घेतले. केदारनाथचे कपाट २३ ऑक्टोबरला, भाऊबीजच्या दिवशी बंद होणार आहेत. त्यामुळे यात्रा अजून १५ दिवस सुरू राहणार आहे. तसेच, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या धामांमध्येही यात्रेकरूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

खरं तर, सुरक्षित चारधाम यात्रा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने पुरेशा आणि योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. यात्रा मार्गांवर सुरक्षेसाठी जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी, भूस्खलनाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील भागांमध्ये मलबा साफ करण्यासाठी जेसीबी यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी ३० एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांचे कपाट उघडण्यात आले होते आणि त्याच दिवशी चारधाम यात्रा सुरू झाली. २ मे रोजी केदारनाथ आणि ४ मे रोजी बद्रीनाथ धामाचे कपाट उघडले गेले. मात्र, मानसून कालावधीत अतिवृष्टी, ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यामुळे चारधाम यात्रा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली.

या नैसर्गिक आपत्तींमध्ये गंगोत्री धामातील एक महत्त्वाचा टप्पा धराली मोठ्या प्रमाणावर नष्ट झाला. रस्ते नष्ट झाल्यामुळे गंगोत्री आणि यमुनोत्री धामांची यात्रा काही काळ थांबवावी लागली होती. त्यामुळे पावसाळ्यानंतर यात्रा पुन्हा सुरळीत करणे ही एक मोठी आणि कठीण जबाबदारी होती.परंतु शासन आणि प्रशासनाच्या टीम्सनी युद्धपातळीवर काम करत मार्ग पुन्हा सुरू केले. परिणामी, दोन्ही धामांची यात्रा योग्य सुरक्षा उपायांसह पुन्हा सुरू करण्यात आली. प्रशासनाकडून यात्रेकरूंना अजूनही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. खराब हवामानात यात्रा टाळावी, असा इशारा वारंवार देण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande