नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
नांदेड जवळील निळा गावातील
पूर परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या विद्यार्थिनींना नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी
शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात पुढे केला.
पेन, पुस्तकं, वह्या आणि इतर शालेय साहित्य देऊन त्यांनी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट पुन्हा मोकळी केली.
नांदेड जवळील निळा गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीत एका शेतकऱ्याचे घर पूर्णतः कोसळले. घरासोबतच जीवनावश्यक अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. मात्र सर्वात जास्त झळ पोहोचली ती त्या घरातील विद्यार्थिनींना. त्यांच्या शैक्षणिक जीवनावरच हा आघात झाला.
या घरात राहणाऱ्या दोन विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी तयार होत्या, परंतु आता त्यांच्याकडे ना पुस्तकं राहिली, ना पेन. वह्या, कपडे, शालेय साहित्य सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं. शिक्षणासाठी जिद्द असतानाही हातात काहीच शिल्लक उरलेलं नव्हतं.
या दोन्ही विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देऊन मदतीचा हात पुढे केला. पेन, पुस्तकं, वह्या आणि इतर शालेय साहित्य देऊन त्यांनी विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट पुन्हा मोकळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis