अमरावती : युवा महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव -2025 अमरावती शहरातील श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात सुरू असून युवा महोत्सवाच्या दुस-या दिवशी विद्याथ्र्यांनी लोकनृत्य, आदिवासी नृत्य,एकांकिका, मु
दुस-या दिवशी लोकनृत्य, आदिवासी नृत्य,एकांकिका, मुकनाट¬,नकला, संगीत,  समूहगान वादविवाद,वक्तृत्व स्पर्धा,


दुस-या दिवशी लोकनृत्य, आदिवासी नृत्य,एकांकिका, मुकनाट¬,नकला, संगीत,  समूहगान वादविवाद,वक्तृत्व स्पर्धा,


अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.)

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सव -2025 अमरावती शहरातील श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात सुरू असून युवा महोत्सवाच्या दुस-या दिवशी विद्याथ्र्यांनी लोकनृत्य, आदिवासी नृत्य,एकांकिका, मुकनाट¬, नकला, पाश्चिमात्य वाद्य संगीत, शास्त्रीय वाद्यसंगीत (तालवाद्य), शास्त्रीय संगीत (स्वरवाद्य), भारतीय सुगम संगीत, भारतीय समूहगान वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्थळचित्र, पोस्टर मेकिंग अशा विविध कलाप्रकारात आपल्या कलेचे बहारदार सादरीकरण केले.विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये विद्यापीठ परिक्षेत्रांतर्गत येणा-या अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्रांच्या 200 महाविद्यालयांचे जवळपास पाच हजार विद्यार्थी, विद्यार्थीनी कलावंत मोठ¬ा संख्येने सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे रितसर उद्घाटन झाल्यानंतर विद्याथ्र्यांच्या कलागुणांना वाव देणा-या कलाप्रकारास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी विद्यार्थी कलावंतांनी लोक/आदिवासी नृत्य, एकांकिका, प्रहसन, मुकनाट¬, भारतीय समूहगान, शास्त्रीय गायनामध्ये उत्तर भारतीय व कर्नाटकी गायन, भारतीय सुगम संगीत, पाश्चिमात्य समूहगान, पाश्चिमात्य एकल गायन अशा कला प्रकाराचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. प्रश्नमंजुषामध्ये लेखी परीक्षा व त्यानंतर अंतिम फेरी घेण्यात आली. त्यानंतर चित्रकला व स्थळ छायाचित्रण अशा कला प्रकारामध्ये विद्याथ्र्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. 10 ऑक्टोबर पर्यंत सदर युवा महोत्सव चालणार असून समारोपीय समारंभामध्ये युवा महोत्सवातील उत्कृष्ट सादरीकरण करणा-या संघाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया, विद्यापीठ विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांच्या नेतृत्वात निवड समिती अध्यक्ष निखिलेश नलोडे, सदस्य डॉ. सावन देशमुख, डॉ. शर्मिला देशमुख, डॉ. प्रशांत बागडे, श्री विजय शर्मा, डॉ. सीमा देशमुख, डॉ. निलेश कडू तसेच महाविद्यालयातील युवा महोत्सव समन्वयक डॉ. तीर्थराज राय, डॉ. माया वाटाणे, डॉ. सोनल चांडक, डॉ. सुनिता धोपटे, विद्यापीठातील श्री संतोष वानखडे, श्री सुधीर देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande