पंतप्रधान मोदींनी मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांची घेतली भेट
मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.९) मुंबईत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. या भेटीत ‘व्हिजन 2035 रोडमॅप’ अंतर्गत भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापक रणनीतिक भागीदारी अधिक बळकट करण्याबाबत चर्चा होणार
पंतप्रधान मोदी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर


मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.९) मुंबईत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेतली. या भेटीत ‘व्हिजन 2035 रोडमॅप’ अंतर्गत भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापक रणनीतिक भागीदारी अधिक बळकट करण्याबाबत चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याच्या मुद्द्यांचा समावेश असण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर हे सीईओ फोरम तसेच ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्येही सहभागी होणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या भारताच्या दौर्‍यावर आहेत. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (शुल्क) धोरणांमुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा जागतिक आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटन यांच्यातील भागीदारी मजबूत होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

याआधी बुधवारी पंतप्रधान स्टार्मरहोतं की भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या संधी अतुलनीय आहेत. पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भारतात येण्याचा हा त्यांचा पहिलाच दौरा असून ते बुधवारी मुंबईत दाखल झाले. स्टार्मर यांनी म्हटलं की, हा व्यापार करार 2028 पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणाऱ्या भारतासोबत द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक ‘लॉंचपॅड’ (उड्डाणपथ) ठरेल. स्टार्मर यांच्यासोबत ब्रिटनमधील व्यापार क्षेत्रातील प्रमुख नेते, उद्योजक आणि विद्यापीठांचे कुलगुरू यांचा समावेश असलेल्या 125 सदस्यीय प्रतिनिधीमंडळाने भारत भेट दिली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, “आपण जुलै महिन्यात भारतासोबत एक मोठा व्यापार करार केला होता, जो कोणत्याही देशाने केलेल्या करारांमध्ये सर्वोत्तम मानला जातो. मात्र ही गोष्ट इथे संपत नाही.” ते पुढे म्हणाले, “हा केवळ कागदाचा तुकडा नाही, तर विकासासाठी एक लॉंचपॅड आहे. भारत 2028 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे आणि भारतासोबतचा व्यापार अधिक जलद व कमी खर्चिक होणार आहे. त्यामुळे जे संधी निर्माण होणार आहेत, त्या खरोखरच अद्वितीय आहेत.”

स्टार्मर म्हणाले की, भारतातील विकासाचा अर्थ ब्रिटिश नागरिकांसाठी अधिक पर्याय, स्थैर्य आणि रोजगार उपलब्ध होणे असा होतो. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याच्या सुमारे अडीच महिने आधी दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

स्टार्मर आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील चर्चेबाबत ब्रिटनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या संवादामुळे भारत-ब्रिटन संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही नेते कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), दूरसंचार आणि संरक्षण तंत्रज्ञान यामध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत, जेणेकरून व्यवसायांसाठी नव्या गुंतवणूक व विकासाच्या संधी निर्माण होतील. निवेदनात म्हटलं आहे की भारत वेगाने जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञान भागीदारांपैकी एक बनत आहे, आणि 2030 पर्यंत भारताचा तंत्रज्ञान क्षेत्राचा एकूण मूल्य 1 लाख कोटी पाउंड होण्याची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande