माळरानावरील जैवविविधता टिकविणे काळाची गरज - पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी
परभणी, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाड्यात समृद्ध जंगलं नसली तरी माळरानाने मराठवाडा समृद्ध आहे, त्यामुळे माळरानावरील जैवविविधता टिकविणे ही येणाऱ्या काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक तथा पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी व्यक्त केले.
माळरानावरील जैवविविधता टिकविणे काळाची गरज - डॉ. दिलीप यार्दी


परभणी, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाड्यात समृद्ध जंगलं नसली तरी माळरानाने मराठवाडा समृद्ध आहे, त्यामुळे माळरानावरील जैवविविधता टिकविणे ही येणाऱ्या काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक तथा पक्षीतज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी यांनी व्यक्त केले.

परभणी शहरातील बी. रघुनाथ महाविद्यालयात निसर्ग अभ्यासक माणिक पुरी यांच्या 'तळे, पक्षी आणि माळरान' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अशोक सोनी, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दिलीप यार्दी व म. सा. प.परभणी शाखेचे अध्यक्ष बा.बा. कोटंबे उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाडा हा बालाघाट आणि अजिंठ्याच्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. वनसंपदेचे क्षेत्रफळ कमी असले तरी माळरानाने मात्र समृद्ध आहे. माळरानावरील पक्षीवैभव आणि वन्यजीवन तितकेच समृद्ध आहे. मात्र मागील काही काळात विकासाच्या नावाखाली मराठवाड्यातील माळराने व त्यावरील पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या अधिवासात मानवी घुसखोरी झाल्याने माळरानावरील जैवविविधता नष्ट करण्यावर भर दिला जात आहे. त्यातच सोलार एनर्जीचे प्लॅंट मोठ्या संख्येने सगळीकडेच उभारल्या जात असल्याने त्याचाही परिणाम या अधिवासावर दिसून येतो. माळरानावरील जैवविविधता संपुष्टात आल्यास मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना मानव जातीला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande