पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ऑक्टोबरमधील भोर व पिरंगुट शिबीर दौऱ्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला असून पिरंगुट शिबीर दौरा १४ ऑक्टोबर रोजी व भोर येथील शिबीर दौरा २९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व अर्जदारांनी सुधारित दिनांकास शिबीर कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु