पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील हिवाळी सत्र परीक्षेसाठी आठवा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. अतिवर्षण आणि सद्यःस्थिती लक्षात घेऊन विलंब आणि अतिविलंब शुल्क आकारण्यात येणार नाही, असेही विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा १५ सप्टेंबरपासून सुरू झाला. आता परीक्षेचा अर्ज भरण्याच्या आठव्या टप्प्यात विद्यार्थ्यांना येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कायम (इनवर्ड) करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे, तर विद्यार्थ्यांने नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी येत्या गुरुवारपर्यंत (ता. १६) अंतिम मुदत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु