पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून ही परीक्षा २१ डिसेंबर ऐवजी २८ डिसेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार असल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु