सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। महापुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाही सध्याचे सरकार मात्र शांतच आहे. याविरोधात शिवसेना ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी, महिलांनी सरकारविरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुख्यमंत्र्यांना कुंभकर्णाची तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झोपेचे सोंग घेतल्याचे पथनाट्य सादर करत उपरोधिक टीका करण्यात आली.
सरकारने तत्काळ ओला दुष्काळ तत्काळ जाहीर न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मंत्र्यांना सोलापूरच्या भूमीवर फिरू देणार नाही, असा इशारा दासरी यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्तांना मदत ही दया नव्हे तर शासनाची जबाबदारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड