सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे ऊस, सोयाबीन, कांदा, सूर्यफूल, उडीद, द्राक्ष व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नदीकाठच्या गावांमधील घरात पाणी शिरल्याने जनतेचे घरगुती साहित्य वाहून गेले असून, नागरिकांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसने सोलापूर जिल्हा ‘ओला दुष्काळ’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना दर हेक्टर ₹५०,००० मदत तातडीने जाहीर करून ती थेट खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत, वीज बिले माफ करावीत आणि नुकसानग्रस्त भागांमध्ये तातडीने पंचनामे करून मदत वितरित करावी, तसेच मोहोळ तालुक्यातील वाघोली मंडळात येणाऱ्या गांवांचे देखील तात्काळ पंचनामे करावे तसेच मा. सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर बुट भिरकावणाऱ्यावर देखील कडक कारवाई करून त्याची सनद रद्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड