साेलापूर शहर हद्द निश्‍चितीच्या वादातून भाजपात संघर्ष
सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। शहर भाजपत वाद उफाळून आला आहे. आमदार विजय देशमुख आणि शहर अध्‍यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीरपणे एकमेकांविरुद्ध वक्‍तव्‍ये देण्‍यापर्यंत विषय पुढे गेला आहे. कोणी कार्यकर्त्यांना त्रास देईल तर कमरेत लाथ घाला, असे म्‍हणण्‍य
साेलापूर शहर हद्द निश्‍चितीच्या वादातून भाजपात संघर्ष


सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

शहर भाजपत वाद उफाळून आला आहे. आमदार विजय देशमुख आणि शहर अध्‍यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीरपणे एकमेकांविरुद्ध वक्‍तव्‍ये देण्‍यापर्यंत विषय पुढे गेला आहे. कोणी कार्यकर्त्यांना त्रास देईल तर कमरेत लाथ घाला, असे म्‍हणण्‍यापर्यंत वाद विकोपाला गेला आहे. याच्‍या मुळाशी शहर उत्तर आणि शहर मध्‍य या दोन विधानसभा मतदारसंघांतील हद्द निश्‍चितीचा वाद आहे.

शहर उत्तरच्‍या कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिला तर शहर उत्तर स्‍टाईलने उत्तर देण्‍यात येईल, अशी बेधडक घोषणा आमदार विजय देशमुख यांनी गेल्‍या महिन्‍यात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या समोरच केली होती. त्‍यानंतर आमदार देशमुख यांनी महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. प्रभाग ११ चा काही भाग शहर उत्तर आणि मध्‍य या दोन्‍ही मतदारसंघात आहे. तेथे आमदार देशमुख हे कार्यक्रम घेताना दुसऱ्या गटाने देशमुख यांच्‍यावर कुरघोडी करण्‍याचा प्रयत्‍न केला. परिणामी अंतर्गत संघर्षाला सुरूवात झाली आहे. निवडणुका जवळ येत जातील तसा हा संघर्ष तीव्र होत जाणार, हे आता स्‍पष्‍ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande