गोरक्षकावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करा - भाजपा आ. अनुराधा चव्हाण
छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील चिकलठाणा परिसरात अवैध गोमांस तस्करी करणाऱ्या गुंडांनी गोरक्षक गणेश शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला‌ होता. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या फुलंब्री विधानसभा मत
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील चिकलठाणा परिसरात अवैध गोमांस तस्करी करणाऱ्या गुंडांनी गोरक्षक गणेश शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला‌ होता. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक प्रवीण पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे.

गणेश शेळके यांना वाचवण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी सचिन शिंदे पुढे गेले, परंतु त्यांच्यावरही हल्ला झाला. दोघांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी या विषयाकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींवर कठोर शिक्षा होण्यासाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande