रब्बी हंगामात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणावे - कुलगुरू इंद्रमणी
छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथे ७८ वी विभागीय रब्बी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक यशस्वी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथे ७८ वी विभागीय रब्बी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक यशस्वी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इन्द्र मणि होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, या परिस्थितीत तग धरून उभ्या असलेल्या पिकांचे संवर्धन आणि आगामी रब्बी हंगामाचे नियोजन यावर विशेष भर देणे आवश्यक आहे. उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर करून रब्बी हंगामात अधिक क्षेत्र लागवडीखाली आणावे, ज्यायोगे खरीप हंगामातील नुकसानाची भरपाई होऊ शकेल. पुढे त्यांनी नमूद केले की, संशोधन संस्था आणि विस्तार विभाग यांनी एकत्रितपणे कार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. कृषि क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी शास्त्रज्ञांचे संशोधन आणि शेतकऱ्यांचा अनुभव यांचा समन्वय अत्यावश्यक आहे. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठ आणि कृषि विभागातील अधिकारी यांनी एकजुटीने कार्य करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व दिलासा द्यावा. नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

“शेतकरी देवो भव:” ही संकल्पना लक्षात घेऊन, विद्यापीठात विकसित तंत्रज्ञान कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले. बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पीक नियोजन, बियाण्यांची उपलब्धता, नवीन तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande