दिवाळीनिमित्त पुण्यातून 'एसटी'च्या ५९८ जादा गाड्या
पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागामार्फत तब्बल ५९८ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत. या कालाव
st


पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे विभागामार्फत तब्बल ५९८ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत. या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वेळापत्रकाचे नियोजन करून विविध स्थानकांतून गाड्या मार्गस्थ होणार आहेत. यामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड स्थानकातून सर्वाधिक ३९६ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

स्वारगेट स्थानकातून नियमित गाड्यांबरोबरच १२२ अतिरिक्त गाड्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण या दिशेने सोडण्यात येणार आहेत. तर, शिवाजीनगर स्थानकातून ८० गाड्या विविध ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत. दिवाळीच्या काळात प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी आणि गर्दीचा ताण कमी व्हावा, यासाठी एमएसआरटीसीकडून ही विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तिकिटांसाठी आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहनही परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande