पुणे - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सवाचे आयोजन
पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे येथील पुना गोअन इन्स्टिट्यूट, नाना पेठ येथील सभागृह
पुणे - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे स्वदेशी महोत्सवाचे आयोजन


पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे येथील पुना गोअन इन्स्टिट्यूट, नाना पेठ येथील सभागृहात खादी व कुटिरोद्योगातून तयार झालेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन (स्वदेशी महोत्सव) आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसंगी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनात खादीचे कुर्ते , साड्या, अन्य कपडे, मध व त्यापासून तयार वस्तू तसेच ग्रामोद्योगातून तयार केलेले मसाले, पापड, लोणचे, कोल्हापूरी चप्पल, पारंपारिक चामड्याच्या वस्तू, दिवाळी फराळ व कंदील, सेंद्रीय साबण, तेल, वनऔषधे, लोकर पासून तयार केलेली घोंगडी आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

सदर प्रदर्शन रोज सकाळी ११.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत खुले असणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण भागातील उत्पादनांची खरेदी करुन स्वदेशी वस्तूंच्या प्रसाराला हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रदर्शनासंबंधी अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सुधीर केंजळे ८२९१९१६६५१ यांच्याशी संपर्क साधावा, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande