पंढरपूर : शिक्षकांच्या बळावर 5 जिल्ह्यात पोहोचले मतदार नोंदणी फॉर्म
सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। पाठीशी कोणताही पक्ष नाही, कोणत्याही सहकारी संस्था नाहीत. फक्त शिक्षक, शिक्षकांसाठी केलेले काम आणि उभा केलेली चळवळ याच्या बळावर पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुणे विभागात तब्बल 77176 शिक
पंढरपूर : शिक्षकांच्या बळावर 5 जिल्ह्यात पोहोचले मतदार नोंदणी फॉर्म


सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। पाठीशी कोणताही पक्ष नाही, कोणत्याही सहकारी संस्था नाहीत. फक्त शिक्षक, शिक्षकांसाठी केलेले काम आणि उभा केलेली चळवळ याच्या बळावर पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुणे विभागात तब्बल 77176 शिक्षक मतदार नोंदणीचे फॉर्म संबंधित शाळा व शिक्षकांपर्यंत पोहोचवले आहेत.

शिक्षक मतदार नोंदणीचे अभियान सुरू झाले आहे. पुढच्यावर्षी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना आधी मतदार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली या पाचही जिल्ह्यात शिक्षकांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.

यामध्ये पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी आघाडी घेतली असून, त्यांनी तब्बल 77176 शिक्षकांना मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande