राज्यातील सर्व शाळांमध्ये स्थापन होणार माजी विद्यार्थी संघ
सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. माजी विद्यार्थ्यांना शा
राज्यातील सर्व शाळांमध्ये स्थापन होणार माजी विद्यार्थी संघ


सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित व खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. माजी विद्यार्थ्यांना शाळांच्या प्रगतीत सहभाग घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या संघामध्ये अध्यक्ष,उपाध्यक्ष,कोषाध्यक्ष, मुख्याध्यापक किंवा प्राचार्य सचिव म्हणून असतील. याशिवाय एक पालक प्रतिनिधी, सेवानिवृत्त अधिकारी व शिक्षक यांचा सल्लागार सदस्य म्हणून समावेश असेल. प्रत्येक शाळेला वर्षातून किमान एकदा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि स्नेहसंमेलन आयोजित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, ख्रिसमस अशा सणांच्या काळात हे कार्यक्रम होतील. त्यात माजी विद्यार्थ्यांचे सत्कार, शाळेचा विकास आराखडा, शिक्षकांचे सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.शाळांच्या भौतिक सुविधा असतील किंवा विविध प्रकारचे विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्य देणे, संगणक संच देण्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे ओळखून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळेत 'माजी विद्यार्थी संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande