पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। सिंबायोसिस स्कूल फॉर लिबरल आर्टस्, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे साहित्य महोत्सव २०२५ चे आयोजन दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून सिंबायोसिस ईशान्य भवन, विमान नगर येथे करण्यात आले आहे. या वर्षीच्या महोत्सवाची थीम 'शाई, कल्पना आणि प्रेरणा अशी आहे. सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी खुला आहे.
महोत्सवाचा उदघाटन सोहळा दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता संपन्न होईल. माननीय खासदार (लोकसभा) आणि परराष्ट्र व्यवहार संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. शशी थरूर यांना या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे व दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभासाठी प्रख्यात भारतीय पटकथा लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर उपस्थित राहतील. डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक व अध्यक्ष, सिंबायोसिस आणि कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. डॉ.विद्या येरवडेकर, प्र कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डॉ. रामकृष्णन रमण कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आदी इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु