टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी
सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रे आणून देत होता. आता, यापुढील काळात मात्र तो तुमच्या घराच्या दारातूनही टपाल घेऊन जाईल. तसेच, पार्सल, स्पीड पोस्टासह अन्य गोष्टी थेट घराच्या दारातून त्य
टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी


सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। आजपर्यंत पोस्टमन काका घराच्या दारापर्यंत टपाल व मनिऑर्डरसह अन्य पत्रे आणून देत होता. आता, यापुढील काळात मात्र तो तुमच्या घराच्या दारातूनही टपाल घेऊन जाईल. तसेच, पार्सल, स्पीड पोस्टासह अन्य गोष्टी थेट घराच्या दारातून त्याच्याकडून स्वीकारले जाणार आहेत. ही नवी सोयी-सुविधा देशातील काही निवडक शहरांत सुरू झाली आहे. नंतर ती आता हळूहळू सुविधा देशातील अन्य शहरांत सुरू होईल.

दरम्यान, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमधील काही शहरे, जोधपूर (राजस्थान), हैदराबादसह प्रतापगड (उत्तर प्रदेश) यासह अन्य काही शहरांमध्ये सुरू झाली असून, लवकरच अन्य मोठ्या शहरांत ती सुरू केली जाणार आहे. एखादी वस्तू 500 रुपयांपेक्षा कमी किमतीची असेल, तर टपालवाहक (पोस्टमन) फक्त 50 रुपये सेवा शुल्क आकारणार आहे. त्यापेक्षा जास्त आर्टिकल्ससाठी शुल्कच आकारले जाणार नाही. पोष्ट विभागाच्या या नव्या धोरणात्मक निर्णयामुळे पोस्ट विभागाकडून खासगी कुरिअर कंपन्यांना थेट स्पर्धा होेणार आहे. पोस्ट विभाग नवनवीन तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करताना दिसत आहे. अ‍ॅडव्हान्स्ड पोस्टल तंत्राचे नवे प्रोग्राम (सॉफ्टवेअर) प्रणाली सुरू केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande