
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय 21 व्या शतकातील जगाचा स्टेथोस्कोप ठरणार आहे. कारण तोच रोगांचे निदान प्रचंड वेगाने करण्यास सक्षम आहे. आपण प्रतिजैविकांचा मारा शरीरावर इतक्या मोठ्या प्रमाणात करीत आहोत. ज्यामुळे 2050 पर्यंत सर्वाधिक मृत्यूचे कारण ही प्रतिजैविक औषधी ठरतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी संचालक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पुणे शहरातील व्याख्यानात दिला.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्यावतीने पाषाण येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘पीआयसी’चे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. स्वामीनाथन यांनी आगामी काळातील मानवी जीवन आणि आरोग्य, वैद्यकीय तंत्रज्ञानातील वेगवान बदल, संशोधन एआयमुळे होणारा आमूलाग्र बदल याचा 2050 पर्यंतचा आरोग्य आलेखच सादर केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु