
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)
बौद्धजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेना प्रमुख सरसेनानी मान. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परळ (मुंबई) येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर मेळाव्याचे आयोजन बौद्धजन पंचायत समिती आणि संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून उद्घाटन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या हस्ते होणार आहे. उपसभापती विनोद मोरे आणि माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे हे उपस्थित तरुण-तरुणी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश घाडगे करतील, तर विवाह मंडळ अध्यक्ष रामदास गमरे प्रास्ताविक मांडतील आणि चिटणीस गौतम जाधव आभार प्रदर्शन करतील.
या कार्यक्रमाला उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ आणि खजिनदार नागसेन गमरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजातील विवाहोच्छुक तरुण-तरुणींनी आपल्या पालकांसह उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नव्या सभासदांसाठी शुल्क रु. ५०० निश्चित करण्यात आले असून, समाजातील सर्वांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके