आष्टीतील जि.प. प्राथमिक शिक्षकांचा पूरग्रस्तांसाठी ५,५८,५९१ निधी जमा
बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। आष्टी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी मोलाचा हातभार लावला आहे. आष्टी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकवृंदांनी सामाजिक जबाबदारीचे अत्यंत सुंदर उदाहरण घालून दिले आहे. अलीक
५,५८,५९१/- इतकी रक्कम पूरग्रस्त निधीसाठी जमा


बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।

आष्टी तालुक्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांनी पूरग्रस्तांसाठी मोलाचा हातभार लावला आहे. आष्टी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकवृंदांनी सामाजिक जबाबदारीचे अत्यंत सुंदर उदाहरण घालून दिले आहे. अलीकडील पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या भागांना मदत म्हणून, या शिक्षकांनी एकत्र येत ₹५,५८,५९१/- इतकी रक्कम पूरग्रस्त निधीसाठी जमा केली.

शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाजातील संवेदनशील नागरिकही आहे, याची ही कृती जिवंत प्रचिती देणारी आहे. आपल्या मेहनतीतून मिळवलेल्या उत्पन्नातून पूरग्रस्त बांधवांसाठी ही आर्थिक मदत उभी करणे, हे खरोखर कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी कौतुक केले आहे

या उपक्रमासाठी आष्टी तालुक्यातील सर्व जि.प. शिक्षकवर्ग, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल, याची मला खात्री आहे. असे आमदार सुरेश धस म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande