
बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा २०२५ मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघातील दोन विद्यार्थ्यांनी अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे, याचा मला मनापासून अभिमान वाटतो, अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे
मौजे सोने सावरगाव (सोने) येथील श्री. प्रकाशकुमार महादेव बडे यांनी NT प्रवर्गातून ५९९ गुण मिळवत राज्यात १४ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच ता. शिरूर का., रा. चाहूरवाडी येथील श्री. नितीन भोलाजी खेंगरे यांनी SEBC प्रवर्गातून ५७३ गुण मिळवत राज्यात १३९ वा क्रमांक मिळवला आहे.
हे दोन्ही युवक आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहेत. त्यांच्या कठोर परिश्रम, चिकाटी यांना मनापासून सलाम करतो. असे ते म्हणाले
त्यांचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत असताना
आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी तुम्ही समाजासाठी नवी दिशा निर्माण कराल, अशी खात्री आहे. असे आमदार सुरेश धस म्हणाले
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis