बच्चू कडूंचं शिंदे गटात होणार पुनर्वसन – आमदार रवी राणा
अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचा मोठा राजकीय दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा म्हणाले की, कडू यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन सुरू
बच्चू कडूंचं शिंदे गटात होणार पुनर्वसन – आमदार रवी राणा यांचा दावा


अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।

प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याचा मोठा राजकीय दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा म्हणाले की, कडू यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन सुरू केलं असलं, तरी त्यामागचा खरा उद्देश त्यांचा राजकीय पुनर्वसनाचा आहे.राणा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सोयाबीन, कापूस, धान, संत्रा, मका आणि ज्वारी अशा पिकांच्या नुकसानीची भरपाई या मदतीतून केली जाणार आहे.त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांचे सातबारा कर्जमुक्त करण्याची सरकारची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी पावले उचलली जात आहेत. तरीदेखील बच्चू कडू आंदोलन करत आहेत. राणा यांनी दावा केला की, कडू यांचा शिंदे यांच्याशी गुवाहाटीपासूनच जुना संबंध आहे. “लवकरच बच्चू कडू शिंदे गटात प्रवेश करतील,” असा ठाम दावा आमदार रवी राणा यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande