बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढ, निसर्गाची अवकृपा, संत्रा उत्पादकांना 300 कोटींचा फटका
* संत्रागळीने उत्पादनात यंदा 60 टक्के घट अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना यंदा मोठा तोटा झाला आहे. बांगलादेशाने मागील दोन वर्षांत निर्यात शुल्क १८ वरून ८८ रुपये किलोपर्यंत वाढवल्याने निर्यात थांबली. तसेच यंदा
बांगलादेशाने वाढवलेले आयात शुल्क:निसर्गाच्या अवकृपेने संत्रा उत्पादकांना 300 कोटींचा फटका, संत्रागळीने उत्पादनात यंदा 60% घट


* संत्रागळीने उत्पादनात यंदा 60 टक्के घट

अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।

अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना यंदा मोठा तोटा झाला आहे. बांगलादेशाने मागील दोन वर्षांत निर्यात शुल्क १८ वरून ८८ रुपये किलोपर्यंत वाढवल्याने निर्यात थांबली. तसेच यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सुमारे साठ टक्के संत्रागळ झाली. संत्रा उत्पादन कमी असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना किमान ४५ रुपये दर अपेक्षित होता. मात्र यंदासुध्दा दर ३०-३५ रुपये किलो मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे यंदा सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

अमरावतीच्या संत्र्याला बांगलादेशमध्ये अधिक मागणी होती. मात्र मागील दोन वर्षांपासून बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर असलेले निर्यात शुल्क वाढवलेले आहे. त्यामुळे अमरावतीतून (वरूड, मोर्शी भागातून) बांगलादेशमध्ये जाणारा संत्रा घेऊन जाणे व्यापाऱ्यांनी जवळजवळ बंद केले. कारण आर्थीकदृष्ट्या ते परवडत नाही, असे व्यापारी म्हणतात. त्यामुळे आता भारतातील अंतर्गत बाजारात संत्रा विकण्याशिवाय पर्याय नाही. वास्तविकता यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मृग बहराच्या संत्र्याचे मोठे नुकसान झाले असून ६० टक्के संत्रागळ झाली आहे. त्यामुळे यंदा संत्र्याला किमान ४५ ते ५० रुपये किलो दर शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते मात्र देशातंर्गत बाजारात संत्र्याला विशेष मागणी नाही.

देशांतर्गत बाजारात फार मागणी नसल्याने अवस्था बिकट

जिल्ह्यात दरवर्षी सात ते साडेसात लाख टन संत्रा उत्पादन होते. यंदा मात्र निसर्गाच्या अवकृपेने ते अडीच लाख टनापर्यंत घटले आहे. भाव ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो मिळत आहे. त्यानुसार ८५० ते ८७५ कोटी रुपये होतात. भाव ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो मिळाल्यास ही रक्कम ११२५ कोटी रुपयांवर पोहोचली असती मात्र भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे किमान सुमारे ३०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande