‘फार्मर आयडी’ नसल्याने अडकली पूर, अतिवृष्टीची मदत!
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) आहे आणि ॲग्रीस्टॅकमधील नावाप्रमाणेच पंचनाम्यातीलही नाव आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी, महापुराच्या भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांकड
Collactor kumar


सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) आहे आणि ॲग्रीस्टॅकमधील नावाप्रमाणेच पंचनाम्यातीलही नाव आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी, महापुराच्या भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅकच नाही आणि ॲग्रीस्टॅक आहे, परंतु पंचनाम्यातील नाव व ॲग्रीस्टॅकमधील नाव यामध्ये तफावत आहे, अशा शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे. ॲग्रीस्टॅक नसलेल्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक देण्यासाठी विशेष कॅम्प सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.भरपाईची रक्कम मिळण्यासाठी ई-केवायसीची अट रद्द केली आहे. परंतु ॲग्रीस्टॅक आवश्‍यक आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ८६७ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. आतापर्यंत २७६ कोटींची भरपाई जमा केली आहे. आज रात्रीपर्यंत १६४ कोटींची भरपाई जमा होईल. एकूण ४४० कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक मिळाल्यानंतर व नावातील दुरुस्ती झाल्यानंतर भरपाईची रक्कम मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक नसल्याने जवळपास १२ टक्के शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. अँग्रीस्टॅक आहे परंतु नावात तफावत असल्याची प्रकरणे साधारणतः १ टक्के एवढी आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande