जालना - अंबड येथे बालविवाह, बालकांच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यशाळा
जालना, 1 नोव्हेंबर (हिं.स.)जालना जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जालना अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून अंबड येथे बालविवाह, बालकांच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यशाळा शंभर दिवस जनजागृती कार्यक्रमांतर्गत अंबड येथे जिल्हा बाल स
जालना - अंबड येथे बालविवाह, बालकांच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यशाळा


जालना, 1 नोव्हेंबर (हिं.स.)जालना जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय जालना अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून अंबड येथे बालविवाह, बालकांच्या अधिकाराबाबत जनजागृती कार्यशाळा शंभर दिवस जनजागृती कार्यक्रमांतर्गत अंबड येथे जिल्हा बाल सर्कल कक्षामार्फत जनजागृती कार्यक्रम जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री कड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. नागरे हे होते. जनजागृतीपर कार्यक्रमाला अंबड तालुक्यातील 250 कार्यकर्त्या उपस्थित होत्या . यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना बाल विवाह कामकाज कायदा, बालकांचे अधिकार, बेटी बचाओ बेटी पढाओ, 1098, गाव बाल संरक्षण समिती गावात बालविवाह होणार नाही याबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे, सचिन चव्हाण, संरक्षण अधिकारी नितिन जराड, मिनाक्षी शिंदे यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande