
बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याचा ४३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, कारखान्याचे संस्थापक अध्यख शिवाजीराव ) पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित , उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेला जय भवानी सहकारी साखर कारखाना पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. अनेक संकटांवर यशस्वी मात करत विद्यमान चेअरमन . अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानीने गाळप क्षमता वाढविण्यासह उप पदार्थांचे उत्पादन वाढविले आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे जय भवानीची प्रगती होऊ शकली. असे यावेळी सांगण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis