
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)होटगी रोडवरील राज्य कामगार विमा रुग्णालयात विमा आयसीयू कक्षाची सुरुवात झाली. राज्यातील अन्य रुग्णालयात ज्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीची आरोग्य सेवा दिली जाते. तशीच आरोग्य सेवा येथील विमा कामगार रुग्णालयात पुढील काळात मिळणार आहे. यामुळे येथील रुग्णालयाचा अत्याधुनिक पद्धतीचा सेवा देणाऱ्या अन्य रुग्णालयात समावेश झाला आहे.येथील कामगारांच्या या विमा रुग्णालयात तातडीच्या वैद्यकीय सेवेचा अभाव होता. रुग्णांची तपासणी करून संदर्भीय वैद्यकीय उपचारासाठी शहरातील अन्य रुग्णालयांशी करार केला होता. यात यशोधरासह अन्य रुग्णालयाचा समावेश होता. तातडीच्या उपचारासाठी अन्य मोठ्या शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी रुग्णालयात पाठवावे लागत असे. अत्यवस्थ रुण आल्यास त्यांना अन्य रुग्णालयाला पाठवण्याशिवाय येथील व्यवस्थापना समोर पर्याय नव्हता.या आयसीयूमध्ये ऑन्कॉलॉजीस्ट डॉ. सुमा डी या सुपरस्पेशालिस्ट असतील. तसेच इन्टेन्व्हीस्ट म्हणून डॉ. विश्चाखा कोनारी, डॉ. आरव कांबळे, डॉ. हिरेमठ, डॉ. प्रशांत खरात, नेफ्रॉलॉजीस्ट डॉ. साजिद शेख, कार्डीओलॉजीस्ट डॉ. विवेक अगरवाल उपलब्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड