
नांदेड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। लोहा-कंधार विधानसभेतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व पदवीधर नोंदणी साठी महत्वपूर्ण बैठक कंधार तालुक्यात संपन्न झाली.
भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात भाजपची एकजूट कायम राखून विजय प्राप्त केला पाहिजे असा सूर निघाला. भाजपच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात आपली ताकद वाढवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली कंधार फार्मसी कॉलेज बाळांतवाडी येथे संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा सरचिटणीस डॉ माधवराव पाटील उचेकर, माणिकराव लोहगावे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील धोंडगे, जिल्हा सचिव शंरद मुंडे, तालुकाध्यक्ष लोहा शहर गजानन सुर्यवंशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व शक्ति केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis