
छत्रपती संभाजीनगर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)गोलटगाव अंतर्गत वडाचीवाडी येथील २ शाळा खोल्या तसेच लालवाडी येथील २ शाळा खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावतो आणि त्यांच्यातील कौशल्य, प्रतिभा आणि गुणांना दिशा मिळते. योग्य संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वतःच्या प्रगतीसोबतच समाज आणि देशाच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलू शकतात. असे फुलंब्री विधानसभा मतदार संघाच्या भाजपचे आमदार अनुराधा चव्हाण यांनी मत व्यक्त केले. या वेळी ज्येष्ठ पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis