धारूरची पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात, लवकर काम पूर्ण होईल - आमदार प्रकाश सोळंके
ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेत ! बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। धारूर येथे नगरपरिषद धारूर, जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सो
त्यांच्या प्रवेशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.


ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थेत !

बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।

धारूर येथे नगरपरिषद धारूर, जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यावेळी उपस्थित होते.

या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. व्यासपीठावर आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, त्याचप्रमाणे गावपातळीवर आणि शहरातही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संघटित पद्धतीने काम करण्याची गरज आहे.

धारूर शहरासाठी अत्यावश्यक असलेली पाणीपुरवठा योजना अजित दादांच्या माध्यमातून मंजूर झाली होती. तथापि, तत्कालीन नगरपरिषदेतील विसंगत राजकारणामुळे ती योजना सुरू होऊ शकली नाही. सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा निधी नव्याने मंजूर झाला असून, सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत योजना पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमदार सोळंके यांनी व्यक्त केला. तसेच या योजनेसाठी सोलार प्लांटद्वारे वीजपुरवठ्याची तरतूद करण्यात आली आहे. शहरात २५ कोटी रुपयांचे रस्ते व नाले बांधकामाचे काम पूर्ण झाले आहे.

मतदान किती मिळाले यापेक्षा लोकांच्या समस्या ओळखून भौतिक विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. नगरोत्थान योजनेतील कामांसाठी १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंभर टक्के यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

धारूर शहराचे वैभव असलेल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी ४० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, पहिल्या टप्प्यातील १२ कोटींचा निधी लवकरच प्राप्त होईल.

धारूर तालुक्यातील ग्रामीण भागात सिंचन सुविधा वाढवण्यासाठी अंजनडोह, मैंदवाडी, जहागिरमोहा, सोनिमोहा आणि कासारी या प्रकल्पांचे प्रस्ताव देखील शासनाकडे सादर केले आहेत.

या बैठकीत बाला भाऊ जाधव, शेख गफार भाई, चोखाराम गायसमुद्रे, प्रभाकर चव्हाण, आवेज कुरेशी, यशवंत गायके, गणेश पुजारी आणि धोंडीराम शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande