
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत नुकतीच संपली आहे. यावर्षी पुणे विभागीय केंद्रातील एकूण 60 हजार प्रवेशांमध्ये सोलापूर जिल्ह्याने एकट्याने 30 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आपले शैक्षणिक वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागीय केंद्रात सोलापूर जिल्ह्याने तब्बल 50 टक्के प्रवेश घेत पुणे विभागात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांना सोयीनुसार शिक्षण घेण्याची मुभा देते. यामुळे नोकरी करणारे, गृहिणी आणि अन्य कारणांमुळे नियमित महाविद्यालयात जाऊ न शकणारे विद्यार्थीही शिक्षणाची आपली इच्छा पूर्ण करू शकतात. कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, कृषी अशा अनेक क्षेत्रांतील अभ्यासक्रम, परवडणारी फी रचना आणि ऑनलाईन अभ्यास साहित्य यामुळे सोलापूरकरांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड