नाफेडची 15 नोव्हेंबरपासून धान खरेदी सुरू, शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन
* अमरावती जिल्ह्यात 15 नोंदणी केंद्रांना मान्यता अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांची खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी ला
15 नोव्हेंबरपासून नाफेडची मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू  शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्ह्यातील 15 नोंदणी केंद्रांना मान्यता


* अमरावती जिल्ह्यात 15 नोंदणी केंद्रांना मान्यता

अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांची खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी दि. 30 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत ही दि. ३१ डिसेंबर आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. खरेदीचा कालावधी हा दि. १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांसाठी राहणार आहे. जिल्ह्यात १५ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात पणन महासंघाचे ८ आणि विदर्भ को-ऑपरेटिव्हच्या ७ उपअभिकर्ता संस्थांच्या खरेदी केंद्रांना शेतकरी नोंदणीसाठी मान्यता मिळाली आहे. पणन महासंघाच्या उपअभिकर्ता संस्थांमध्ये अचलपूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संघ मर्यादित, अचलपूर, जयसिंग विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, पथ्रोट, दर्यापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, दर्यापुर, धारणी तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित, धारणी, नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, नेरपिंगळाई, चांदुर रेल्वे विकास खंड सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती मर्यादित, नांदगाव खंडेश्वर, डॉ. बी. पी. देशमुख तिवसा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादित तिवसा यांचा समावेश आहे. विदर्भ को-ऑपरेटिव्ह उपअभिकर्ता संस्थांमध्ये विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन अमरावती, अंजनगाव सुर्जी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार सहकारी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, चांदुर बाजार, शिंगणापूर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, दर्यापूरला शिंगणापूर, दत्तापूर (धामणगाव) ॲग्रीकल्चर खरेदी विक्री संघ, धामणगाव रेल्वे, मोर्शी तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ, मोर्शी, वरुड तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संघ, वरुड यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा. नोंदणीसाठी स्वतःचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, चालु हंगामातील पीक पेरा नमुद केलेला सातबारा, नमुना आठ-अ, सामाईक सातबारा क्षेत्र असल्यास सर्वांचे आधारकार्डसह संमती पत्र, अद्यावत बँक पासबुकची झेरॉक्स कागदपत्रे आवश्यक आहे. हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीकरीता शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी. शासनाने ठरवलेल्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये बसणारे सोयाबीन विक्रीसाठी आणावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande