पुणे -पालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी सुरू
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)महापालिका निवडणुकीच्या प्रभागांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आल्यानंतर आता या मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठीची जबाबदारी महापालिकेच्या सहाय्यक आयु
पुणे -पालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी सुरू


पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)महापालिका निवडणुकीच्या प्रभागांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे समोर आल्यानंतर आता या मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठीची जबाबदारी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आली असून, याबाबतचे आदेश नुकतेच निवडणूक विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून प्रभागांच्या मतदार यादी विभाजनाचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र, मतदार याद्यांचे विभाजन करताना काही इच्छुकांनी घुसखोरी करून त्यांना अनुकूल नसलेल्या मतदारांची नावे अन्य प्रभागात ढकलण्याचा तर अनुकूल असलेल्या शेजारील प्रभागांमधील मतदार याद्या स्वत:च्या प्रभागात लावण्याचे काही प्रकार समोर आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande