पुणे -सौर ऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची विजेच्या बिलात तब्बल ५ कोटी ९१ लाखांची बचत
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतित
Solor


पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित ऊर्जेकडे वाटचाल करत सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जास्वावलंबनाचा नवा टप्पा गाठला आहे. महापालिकेने स्वमालकीच्या विविध इमारतींवर सौर यंत्रणा (सोलर रुफटॉप) कार्यान्वित केल्या असून, याद्वारे प्रतितास ३ मेगावॅट क्षमतेची वीज तयार होत आहे. यामुळे महापालिकेच्या वीजबिलात तब्बल ५ कोटी ९१ लाख रुपयांची बचत झाली आहे.महापालिकेने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत स्वमालकीच्या इमारतींवर सौर यंत्रणा उभारली आहे. यामध्ये पिंपरी येथील महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, शाळा, स्मशानभूमी, जलतरण तलाव, नाट्यगृह, बॅडमिंटन हॉल, रुग्णालये अशा विविध ८६ ठिकाणी सौर पॅनेल्स महापालिकेने बसवले आहेत. याद्वारे सप्टेंबर २०२५ पर्यंत ५९ लाख १७ हजार ११२ युनिट्स वीज निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून आर्थिक बचतीबरोबरच शहराच्या पर्यावरणपूरक वाटचालीला चालना मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande