सोलापूर-एसटीला दिवाळीत 14 कोटींचे उत्पन्न
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)दिवाळी सणाच्या कालावधीत प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून वाढीव एसटी बसचे नियोजन केले होते. महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या तिजोरीत चौदा कोटी सहा लाख रुपये उत्पन
st


सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)दिवाळी सणाच्या कालावधीत प्रवाशांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून वाढीव एसटी बसचे नियोजन केले होते. महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या तिजोरीत चौदा कोटी सहा लाख रुपये उत्पन्नाची भर पडली. या सणासाठी महामंडळाची लालपरी नऊ दिवस विविध मार्गावरून 26 लाख 55 हजार किलोमीटर अंतर धावली. दिवाळीच्या सणात महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी असलेल्या सवलतीतील प्रवासाच्या सर्व योजनांचा लाभ प्रवाशांना मिळाला.दिवाळीसाठी सोलापूर विभागातील सर्व नऊ आगारातून पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सांगली व सातारा यासह अन्य मार्गावर वाढीव एसटी बसेस सोडण्यात आले होते. यामुळे मूळगावी कुटुंबीय व नातेवाईकांसमवेत सण साजरा करता आला. सलग नऊ दिवस एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक हे विविध मार्गावरून व अन्य ठिकाणावरील प्रवाशांची ने-आण करत होते. दिवाळीच्या कालावधीत सोलापूरसह या विभागातील नऊ आगारातील चालक-वाहकांनी दिवस-रात्र एसटीचे चाक फिरवत राहिले. तसेच एसटीचे चाक थांबू नये यासाठी यांत्रिक विभागातील सर्व तंत्रज्ञांनी काळजी घेतली. यामुळे एसटीच्या तिजोरीत 14 कोटी 55 लाख रुपयांची भर पडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande