
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : रजेचा अर्ज किंवा पूर्वमंजुरी न घेता विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी महापालिकेतील घनकचरा विभागाकडील 15 सेवकांना कामावर सेवेतून काढण्यात आले आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील झाडुवाली, बिगारी, वाहन चालक आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. संबंधितांची सुनावणी घेऊन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही कारवाई केली आहे.
या कर्मचार्यांकडे नेमून दिलेल्या प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विनापरवालगी गैरहजेर राहिल्यामुळे प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण झाला. जे सेवक दीर्घकाळापासून विनापरवाना गैरहजर आहेत, अशा सेवकांची माहिती मागविण्यात आलेली होती. सेवकांची यादी तयार करुन यादीतील गैरहजर सेवकांच्या सेवापुस्तकासह महापालिका आयुक्त यांचेकडे हजर सेवकांची सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान आयुक्तांनी माहिती घेऊन यादीमधील काही सेवकांना सेवेतून कमी करणे बाबत, काही सेवकांना प्रत्येकी 10 हजार रुपये इतका दंड करुन कामावर घेणे बाबत आदेश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड