वंदे मातरम गीताच्या सामूहिक गान सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। शासनाच्या निर्देशानुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वंदे मातरम या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गानचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांत
वंदे मातरम गीताच्या सामूहिक गान सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य


पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। शासनाच्या निर्देशानुसार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वंदे मातरम या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गानचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी वंदे मातरम गीताच्या सामूहिक गान प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार सर्वसाधारण, पुणे यांनी केले आहे.या उपक्रमाचा उद्देश देशभक्तीची भावना दृढ करणे आणि वंदे मातरम या राष्ट्रगीतास १५० व्या वर्षानिमित्त अभिवादन करणे हा असून, जिल्ह्यात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडावा असे आवाहनही तहसिलदार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande