परभणी - पालम बाजार समितीच्या उपसभापतीपदी विष्णुपंत शिंदे बिनविरोध
परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी विष्णुपंत नारायणराव शिंदे नाव्हलगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.या बैठकीस सभापती तुषार गोळेगावकर अध्यक्षस्थान
पालम बाजार समितीच्या उपसभापतीपदी विष्णुपंत शिंदे यांची बिनविरोध


परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.)पालम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी विष्णुपंत नारायणराव शिंदे नाव्हलगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.या बैठकीस सभापती तुषार गोळेगावकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीदरम्यान सर्व संचालकांनी एकमताने विष्णुपंत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांना उपसभापतीपदी निवडून दिले.

निवडीनंतर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे, माजी नगराध्यक्ष वसंतराव सिरस्कर, नगराध्यक्ष इमदादउल्लाखाँ पठाण, सभापती तुषार गोळेगावकर, रत्नाकरराव शिंदे, माधवराव गायकवाड, अ‍ॅड. संदीप पाटील, बळीराम चौरे, प्रल्हादराव कराळे, श्यामराव काळे, डॉ. रामराव उंदरे, भाऊसाहेब पौळ, रमेश गायकवाड, डॉ. दिपेंद्र पाटील, गणेश हत्तीअंबीरे, अतुल धुळगंडे, मोतीराम खंडागळे, महादेव खेडकर, शिवाजीराव राऊत, प्रल्हादराव काळे, दिपक रुद्रवार आदींनी नूतन उपसभापती विष्णुपंत शिंदे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

“पदाला व शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करणार”

निवडीनंतर भावना व्यक्त करताना नूतन उपसभापती विष्णुपंत शिंदे म्हणाले की, “माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला उपसभापती पदाची जबाबदारी देण्यात आली, ही माझ्यासाठी मोठी गौरवाची बाब आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नारायणराव शिंदे यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठेवत मी पदाला व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande