सोलापूर : निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षणानंतर इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन जिल्हा परिषद गटातून या मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्
सोलापूर : निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी


सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षणानंतर इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या तीन जिल्हा परिषद गटातून या मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अवतीभवती उमेदवारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळते. त्यातल्या त्यात या मतदारसंघातील बोरामणी जिल्हा परिषद हा गट खुला झाल्याने या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे .

या भागातील जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते सिद्धाराम हेले, उळे गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक नेताजी खंडागळे, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, बोरामणीचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे समर्थक शिवसेना नेते धनेश अचलारे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख अनिता माळगे, काँग्रेस नेते, माजी सरपंच विजय राठोड, संदीप राठोड यांची नावे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.बोरामणी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या ठिकाणाहून आजपर्यंत स्वर्गीय नेते उमाकांत राठोड हे निवडून जायचे आता मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत. या भागात काँग्रेसला नेतृत्व दिसत नाही तरीही मतदार हा काँग्रेस सोबत असल्याचे लोक सांगतात. त्यामुळे उमाकांत राठोड यांचे चिरंजीव विजय राठोड हे इच्छुक असल्याचे दिसून येते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande