बीड जिल्ह्यात तब्बल १३3५ उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा बीडमध्ये एकूण ८ उपकेंद्रामधून पार पडली. ही परीक्षाअशी दोन सत्रात घेण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राज
बीड जिल्ह्यात तब्बल १३3५ उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा


बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा बीडमध्ये एकूण ८ उपकेंद्रामधून पार पडली. ही परीक्षाअशी दोन सत्रात घेण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातून २ हजार ३१ उमेदवारांनी अर्ज केले होते. सप्टेंबर महिन्यातच ही परिक्षा होणार होती परंतु, अतिवृष्टीमुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा बीड शहरात चंपावती विद्यालय, चंपावती इंग्लिश स्कूल, भगवान विद्यालय, शिवाजी विद्यालय, केएसके महाविद्यालय, संस्कार विद्यालय, छ.शाहू माध्यमिक विद्यालय, चंपावती प्राथमिक विद्यालय या ८ केंद्रांवरून पार पडली. पहिल्या सत्रात २ हजार ३१ पैकी १३३५ उमेदवार हजर होते तर ६९६ उमेदवार गैरहजर होते. दुपारच्या सत्रात १३२१ उमेदवार हजर होते तर ७१० उमेदवार गैरहजर होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ८ उपकेंद्रप्रमुख १६ मदतनीस ३२ पर्यवेक्षक १०३ समवेक्षक असे एकूण १५९ अधिकारी, कर्मचारी यांची जिल्हा प्रशासनाद्वारे नियुक्ती करण्यात आलेली होती. १०० मीटर परिघात मनाई आदेश लागू केले होते. परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी करुनच परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला होता. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande