
छत्रपती संभाजीनगर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)फुलंब्री तालुक्यातील आसरा माता मंदिर मौजे आळंद या पवित्र स्थळाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. फुलंब्री विधानसभा मतदार संघाच्या भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत या निर्णयामुळे फुलंब्री तालुक्याचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या नवा अध्याय सुरू झाला आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील विकासकामांना गती मिळेल, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील आणि भाविकांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण सहजच पाठपुरावा केल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis